Duryodhan दुर्योधन by Kaka Vidhate
Duryodhan दुर्योधन by Kaka Vidhate
Regular price
Rs. 738.00
Regular price
Rs. 820.00
Sale price
Rs. 738.00
Unit price
/
per
दुर्योधन - दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला सम्राटपदाची हाव आहे. शत्रूविषयी मी मत्सरी आहे. त्याचा उत्कर्ष हे माझ्या असंतोषाचं कारण ठरू शकतं. राजाचा देहच मुळी अभिमानातून घडलेला असतो. त्यामुळे अहंमन्यता हा त्याच्या लेखी दुर्गुण समजता येणार नाही. शत्रूचा नाश चिंतणं, त्यासाठी प्रयत्नशील रहाणं हा दुष्टपणा ठरतो असं मला वाटत नाही. ऋण, अग्नी नि शत्रू यांचा मुळापासून संहार केला पाहिजे हे माझ्या राजनीतीचं मुख्य सूत्र आहे. मी कौरवांचा युवराज आहे. प्रजेचा नियंता, भूपाल नि सीमांचा संरक्षक आहे मी. शांतिवचनाचं वावडं मला नाही, सज्जनांचा तिटकाराही नाही. माझी खरी अडचण ही आहे की, स्वत:चा पराक्रम, प्रतिभा, राजकीय हक्क-अधिकार मी या ऋषि-मुनींच्या चरणांवर समर्पित करू शकत नाही; त्यांच्या सल्ल्यानं राज्य चालवू शकत नाही.” – दुर्योधन