Skip to product information
1 of 1

Dwidal By Dr. Bal Phondke

Dwidal By Dr. Bal Phondke

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
‘द्विदल’ या कथासंग्रहातील दोन कथांपैकी पहिली कथा आहे नार्सिसस. सदर कथा ही जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. अमर बोस व त्यांची पत्नी शर्मिला बोस या पात्रांभोवती फिरते. डॉ. बोस यांना ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ नावाचा असाध्य आजार जडल्यामुळे त्यांचे शरीर सर्व संवेदना हरवून बसले आहे. या स्थितीतही केवळ आपल्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर त्यांनी संशोधन करून विज्ञान जगतात आपला ठसा उमटवलेला असतो. त्यांची पत्नी शर्मिलादेखील वैज्ञानिक असते; परंतु बिछान्याला खिळलेल्या पतीसाठी, पतीची प्रतिभा चमकावी म्हणून तिने आपल्या करिअरचा त्याग केलेला असतो. स्वतःचे मन मारून, सर्व सुखांचा त्याग करून शर्मिला आपल्या पतीच्या सेवेसाठी दिवसरात्र तत्पर असते. अमेरिकेत राहणारे बोस पती-पत्नी व्याख्यानांच्या निमित्ताने भारतातील ‘इाQन्स्टट्यूट ऑफ सायन्स’च्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये उतरलेले असताना एका रात्री डॉ. बोस यांच्यावर हल्ला होतो. संशयाची सुई सर्वप्रथम त्यांच्या पत्नी शर्मिला बोस यांच्यावरच रोखली जाते. त्यातूनच डॉ. कौशिक व कमिशनर अमृतराव यांच्यासमोर बोस पती-पत्नीच्या नात्यातला कडवटपणा समोर येतो. परंतु तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. कौशिक व अमृतराव यशस्वीपणे खऱ्या हल्लेखोरापर्यंत पोहोचतात. ‘द्विदल’मधील दुसरी कथा आहे ‘कोव्हॅलंट बाँड.’ ही कथा माधवी, जयंतीबेन आणि दहा वर्षांची एक मुलगी यांच्याभोवती फिरते. एक दहा वर्षांची मुलगी आणि तिच्यावर हक्क सांगणाNया दोन माता. वैज्ञानिकदृष्ट्या दोन्ही माता या त्या मुलीच्या खऱ्या (जैविक) माताच असताना कोणाचा त्या मुलीवर खरा हक्क आहे, हा गुंता सोडवण्यात कमिशनर अमृतराव आणि डॉ. कौशिक कितपत यशस्वी होतात, हे बघणं औत्सुक्याचे ठरते. दोन्हीही कथा वेगळा विषय घेऊन पुढे येताना दिसतात. आजच्या काळात विज्ञानामुळे निर्माण झालेले प्रश्न विज्ञानच सोडवते. केवळ विचारांची योग्य तर्वÂसंगती लावणे आवश्यक आहे, हेच ‘द्विदल’मधील कथा सुचवतात.
View full details