1
/
of
1
Ek Hota Rajaputra by PATIL PRAKASH
Ek Hota Rajaputra by PATIL PRAKASH
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
राजस - अफाट स्मरणशक्ती असलेला, मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चा पदवीधर तरुण. त्याने कधीही न पाहिलेली पण प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली ठिकाणं, त्याने कधीही न पाहिलेल्या पण १८व्या शतकात होऊन गेलेल्या व्यक्ती, घडून गेलेल्या घटना लहानपणापासून त्याला स्वप्नात दिसतात. त्यांचा आपल्याशी काहीतरी संबंध आहे असं त्याला वाटू लागतं. तो स्वतः पूर्वजन्मीचा राजपुत्र चंद्रसेन असल्याचे त्याला भास होतात, स्वप्नं पडतात.... आणि यातून त्याच्या कुंचल्यातून साकार होते- एक गूढ चित्रांची मालिका! त्या चित्रांचा मागोवा घेण्यासाठी, आपल्या पुनर्जन्माच्या रहस्याचा शोध घेत, तो त्या चित्रांच्या उगमस्थानी पोहोचतो. जंगलातला रस्ता, खळखळणारे झरे, सरोवर, घोडेस्वारी, डोंगरावरचं शिव मंदिर, राजमहाल, किल्ला यांच्याशी निगडित साऱ्या घटना त्याला आठवत जातात. तिथला निसर्ग, त्या वास्तू, ती स्थळं त्याला परिचयाची वाटतात. या प्रवासात त्याच्या प्रेमात पडते सौंदर्यवती कंचन, जी हुबेहूब राजकन्या रूपशिखासारखी दिसत असते! तिला वाटत असतं की राजपुत्र चंद्रसेनचा पुनर्जन्म झाला आहे, आणि राजसच राजपुत्र चंद्रसेन आहे. एक दिवस अचानक एक बंगाली व्यक्ती त्या ठिकाणी येते, तेव्हा १८ वर्षांपूर्वी घडलेली एक घटना राजसला आठवते आणि साऱ्या रहस्याचा उलगडा होतो. काय असतं ते रहस्य ? रहस्य उलगडल्यानंतर कंचन - राजसचं प्रेम अबाधित राहतं का ? तो स्वतः कोण असतो ? कोण असतो राजपुत्र चंद्रसेन ? आणि कोण असते राजकन्या रूपशिखा ? डोंगरदऱ्यांमधून सळसळत जाणारी एक थरारक पण हळुवार प्रेमात गुंफलेली रहस्यमय कादंबरी !
Share
