Eka Matecha Ladha
Eka Matecha Ladha
Regular price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 266.00
Unit price
/
per
आईचा आपल्या मुलाबद्दलचा शोक आणि ’पालकदुराव्याची लक्षणे’ (पॅरेन्टलएलिनेशनसिंड्रोम - पी.ए.एस.) सांगणारी ही दुपदरी कहाणीआहे. 1985 मध्ये डॉ.रिचर्ड गार्डनर यांनी ’पीएएस’ प्रथम उजेडात आणला. मुला बद्दलचा कस्टडीचा वाद आणि तदनुषंगाने मुलाला पढवणे, दुसर्या जोडीदाराबद्दल मुलाच्या मनात विषकालवणे (इतकंकी, ते पढवलेले विचार शेवटी त्या मुलाला स्वत:चेच वाटू लागतात.) यामुळे त्यामुलाचे मानसिक संतुलन ढासळते. यालाच ’पीएएस’ नाव दिले गेले. पॅमेला रिचर्डसनचा मुलगा डॅशहात्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून पीएएसपीडित होता. याला कारण त्याचा बापच होता. फोनवरचे निर्बंध आणि अॅक्सेसमध्ये आणलेले अगणित अडथळे याकडे दुर्लक्षकरून, ’आपल्या आईने आपल्याला टाकून दिलं, तिने विश्वासघात केला,’ हेडॅशच्या मनावर हरतर्हेने बिंबवले गेले. आणि आठवर्षांच्या डॅशने ठरवलेकी, आईकडे जाण्यासाठी त्याच्यावर बळजबरी करू नये. शेवटीतर त्याने आईला असे ही सांगितले की, ’जर आई कोर्टात गेली, तर तो तिचे तोंडही पाहणार नाही.’ यानंतरची आठ वर्षे डॅशचा बाप, न्यायव्यवस्था, मानसोपचार- तज्ज्ञ, शिक्षण व्यवस्थायासार्यांशी पॅमेला झुंजत राहिली.आपल्या मुलाचा त्याच्या बापापासून आणि शेवटी त्याचा त्याच्या स्वत:पासून बचाव करण्यासाठी झगडत राहिली.