1
/
of
1
Exodus
Exodus
Regular price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 585.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
रोमन सम्राट व्हेस्पासियन याने आपला सेनापती टायटस याला दोन साध्या आज्ञा दिल्या. ज्यूंचे देऊळ जमीनदोस्त करा. सर्व ज्यूंना ठार मारा. जेरुसलेमच्या पाडावानंतर त्याने या आज्ञांचे तंतोतंत पालन करायला सुरूवात करताच जिवाच्या आकांताने देशोधडीला लागलेले ज्यू जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले. त्यांना स्वत:चा असा देशच राहिला नाही. ते जिथे जिथे पोचले, तिथे तिथे त्यांनी आपल्या देशाची स्मृती कायम मनात ठेवली. अपार कष्ट, हालअपेष्टा, जुलूम आणि कत्तली यांना तोंड देत आपला धर्म जिंवत ठेवला. दोन हजार वर्षे आपल्या ईश्वरदत्त पवित्र भूमीवर आपल्या प्राचीन राज्याची पुन्हा स्थापना करण्याचा ध्यास धरणार्या देशोदेशींच्या हद्दपार ज्यूंची - पासोव्हरची प्रार्थना संपत असे - ‘‘पुढल्या वर्षी जेरुसलेममध्ये’’ या शब्दांनीच. इतिहासाचा मागोवा घेत, जिद्दीने उभारलेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसासाठी तेवढाच प्रखर लढा देणार्या ज्यूंची कथा सांगणार्या श्री. लिऑन युरिस यांच्या एक्झोडस् या पुस्तकाचा हा अनुवाद.
Share
