Fantastic Feluda – Badshahachi Angathi By Satyajit Ray
Fantastic Feluda – Badshahachi Angathi By Satyajit Ray
प्रख्यात गुप्तहेर फेलूदा आणि त्याचा किशोरवयीन साहाय्यक तोपशे यांच्या ‘बादशहाची अंगठी’ या कादंबरीत साहस, रहस्य आणि गुंतागुंत यांचे वाचकांना खिळवून टाकणारे उत्कंठावर्धक मिश्रण आहे. फेलूदा व तोपशे लखनऊमध्ये सुटी घालवत असताना एक मोगलकालीन अमूल्य अंगठी चोरीस जाते. फेलूदा तपासाला सुरुवात करतो आणि प्रारंभ होतो एका दुष्ट गुन्हेगाराच्या पाठलागाला. हा पाठलाग त्याला थेट लक्ष्मणझुल्यापर्यंत घेऊन जातो. तेथे एका खडखड्या सापाशी त्याला सामना करावा लागतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!