Fantastic Feluda – Green Giftset Of 6 Books By Satyajit Ray
Fantastic Feluda – Green Giftset Of 6 Books By Satyajit Ray
भुवनेश्वर येथील मंदिरातील यक्षीच्या पुतळ्याचे मस्तक चोरीला जाते. ते खरेदी करणारा अमेरिकन विमान अपघातात मरण पावतो. भारतातील अमूल्य शिल्पांची तस्करी रोखण्यासाठी यक्षीच्या मस्तकाच्या चोरीचा मागोवा घेत फेलूदा, तोपशे आणि जटायू थेट वेरुळच्या गुंफांपाशी पोहोचतात. परंतु तेथे बॉलिवुडच्या एका चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी आलेले फिल्म युनिट आणि अचानक झालेला एक खून यामुळे गुंतागुंत कमालीची वाढते. बदमाशांनी आणखी एखादा पुतळा चोरण्यापूर्वी फेलूदा आपले सारे कौशल्य वापरून या प्रकरणाची उकल करतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे पाचवे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!