Your cart is empty now.
भारतामध्ये जसे काशीला महत्त्व आहे तसेच महत्त्व नासिकच्या पुण्यभूमीला आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नासिक शहर आणि परिसरामध्ये असलेल्या ठिकाणांना इतिहास तर लाभलेला आहेच परंतु काही ठिकाणांना स्थानिक कथादेखील लाभलेल्या आहेत. बरेच वेळेला असे होते की नासिक आणि परिसरामध्ये असलेल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतो, परंतु तेथे असलेली आडवाटेवरची स्थळे फारशी प्रसिद्ध नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे बघायची राहून जातात. अशाच नासिकच्या आडवाटेवर असलेल्या ठिकाणांची लेखक अनुराग वैद्य यांनी महाराष्ट्राची शोधयात्रा – नासिकची वारसास्थळे या पुस्तकात संदर्भासहित माहिती दिलेली आहे.
Added to cart successfully!