Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 360.00Rs. 400.00
*गणिका, महात्मा आणि इटालियन ब्राम्हण मनू एस. पिल्लई* जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत - या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत. या निबंधांचे वाचन करताना आपण भारताच्या कहाणीत बुडून जातो. ज्या स्त्री-पुरुषांचे जीवन नाट्य आणि वेगवेगळ्या कृत्यांनी ओसंडून वाहते आहे, अशांच्या अनुभवांवर मनन-चिंतन करू लागतो. रेल्वे येथे कशी आली, भारतीय फुटबॉलचा इतिहास काय होता, ते यातून आपल्याला कळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रयत्न केले होते, हे यातून आपल्याला कळते. जयपूरच्या महाराजांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणीही यातच समजते. समतोल विचारांच्या मनू पिल्लई यांच्यासारख्या इतिहासकार आणि कथनकाराच्या हातात आल्यावर या कहाण्यांतील स्त्री-पुरुष आपल्याला 'तेव्हा काय होतं' हे दाखवतात आणि 'काय असू शकलं असतं' हेही सांगतात. तसं करताकरता एकीकडे ते वर्तमान काळातील चिंता आणि दृष्टिकोन यांविषयीही भाष्य करतात, हे फारच विलक्षण वाटते.
Categories:
Translation missing: en.general.search.loading