Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Gharghuti Aaushadupchar By Premlata Parlikar
Rs. 0.00
दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’!
सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्‍या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्‍या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या.

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading