Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Governance For Growth In India गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया By Dr. A.P.J. Abdul Kalam
Rs. 158.00Rs. 175.00

भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं. डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम, भारताचे अकरावे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान विशेषज्ञ, शिक्षक आणि थोर विचारवंत आहेत. संपूर्ण भारतभर प्रवास, दौरे करून जवळजवळ 17 दशलक्ष युवकांशी त्ङ्मांनी संवाद साधला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचा प्रचंड अनुभव आणि सखोल दृष्टिकोन वापरून शासनाच्या विविध घटकांची चर्चा केली आहे. भविष्यातील भारताविषयी असणारा त्यांचा दृष्टिकोन ते स्पष्टपणे मांडतात. तसेच तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काय केले पाहिजे,हेही सांगतात. त्यांच्या मते, प्रामणिकपणा, उच्च नीतिमत्ता आणि कठोर परिश्रम याद्वारेच आपण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतो. भ्रष्टाचारावरील उपाय, शासनपद्धती आणि विश्वासार्हता यावर वास्तववादी आणि टप्प्याटप्प्याने वापरता येतील असे मुद्दे या पुस्तकाद्वारे डॉ. कलाम आपल्यासमोर मांडतात. ते अशा भारताचं स्वप्न बघतात, जो आशावादी, विकासात्मक आणि सकारात्मक असेल आणि जिथे प्रत्येक नागरिकाचा संपूर्ण विकास होईल. दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील.

प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता. - ए.पी.जे अब्दुल कलाम

Translation missing: en.general.search.loading