Skip to product information
1 of 1

GST Aaplyasathi

GST Aaplyasathi

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
मान्यवरांच्या प्रतिक्रिया कर हा सरकार आणि नागरिक या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचा विषय आहे.
त्यामुळे याविषयी समाजात जास्तीत-जास्त जागृती निर्माण होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने श्री. उमेश शर्मा यांनी केलेले लिखाण निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.
देशात आता वस्तू व सेवाकर लागू होऊन अप्रत्यक्ष करप्रणालीत सुसूत्रता आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
भविष्यात करांविषयी अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीला हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
– श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र या पुस्तकात आपण जी एस टी संबंधी अथपासून इतिपर्यंत सर्व विषयांचा साकल्याने समावेश केला आहे.
“कर’ यासारखा किचकट विषय असूनसुद्धा, सहज सर्वांना समजेल अशा भाषेतील हे लिखाण मनाला भावले.
पुस्तकाची मांडणी अतिशय उत्तम आणि नजरेला सुखावणारी. 
या भाषेमुळे, या मांडणीमुळे सर्वजण हे पुस्तक आपलेसे करतील.
मला खात्रीने वाटते की, या पुस्तकामुळे “कर’ या विषयातील सर्वसामान्यांची भीती जाऊन ते आपले करनियोजन सहजच करू शकतील.
– श्री. सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे भारताला आर्थिक सबल बनविण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी हे पुस्तक मोलाचे ठरेल.
या पुस्तकामुळे जी जनजागृती होणार आहे, तिचाही या मोहिमेत अगदी महत्त्वाचा वाटा असेल.
हे पुस्तक सर्वसामान्य जनतेला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
माझ्याकडून या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा !
– श्री. प्रशांत बंब, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा आपल्या देशामध्ये आर्थिक बाबतीत सलगपणे लेखन करणारे खूप कमी लोक आहेत. सामान्य जनतेला आयकर, विक्रीकर, सेवाकर हे सर्व विषय खूप क्लिष्ट वाटतात. यामध्ये सतत बदल होत असताना या गोष्टी समजावून घेणे या पुस्तकाद्वारे सर्वांना सोपे जाईल.

– श्री. राजेंद्र दर्डा, माजी शिक्षणमंत्री व राज्य अर्थमंत्री

Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts
View full details