`कबीर म्हणतात... गुरूदेव बिन जीव की कल्पना ना मिटे। शोधाची पहिली पायरी आहे अज्ञान. अज्ञानी कल्पनेमध्ये जगत असतो. कल्पना अज्ञानाचं सूत्र आहे; तर सत्य ज्ञानाचं. गुरु तुमचा हात धरून हळूहळू तुम्हाला सत्याकडे नेतो. गुरु तुम्हाला तुमच्या कल्पनेपासून मुक्त करतो. तुम्ही स्वत:च्याच आधाराने चालत राहिलात, शोधत राहिलात तर रस्ता चुकणारच. तुम्ही जे शोधत आहात ते त्याला कधीच मिळालेलं आहे. तुमच्यात आणि गुरुमध्ये एवढंच अंतर आहे की, तुम्ही प्रारंभ आहात तो अंत आहे.` कबीरांसारखे वेडे क्वचितच भेटतात. पण जो कोणी त्यांचे दोहे वाचतो, त्यांचे विचार वाचतो, त्यांची भक्ती पाहतो, तो प्रत्येकजण कबीरासारखाच वेडा होऊन जातो. अशांमधलेच एक होते ‘ओशो’ कबीराच्या दोह्यांमधून त्यांनी अनेक नवे अर्थ शोधले आणि ते आपल्या प्रवचनांमधून सर्वांना सांगितले. कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन लावलेला हा शोध वेगळा!