Skip to product information
1 of 1

Hasari Shala by Sou. Pratibha Padmakar Jagdale हसरी शाळा (बालकविता संग्रह)

Hasari Shala by Sou. Pratibha Padmakar Jagdale हसरी शाळा (बालकविता संग्रह)

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

महाराष्ट्रात प्रामुख्याने बालसाहित्य विश्वात मराठीतील अनेक मान्यवर व प्रतिभावान सारस्वतांनी आपले योगदान देऊन बालसाहित्य अधिक सकस व समृद्ध केले आहे. ही प्रतिभा आणि बालसाहित्यिकांची परंपरा हा बालकविता संग्रह लिहून प्रतिभा जगदाळे यांनी जपली आहे, वृद्धिंगत केली आहे. मुलांचं रंजन करीत करीत त्यांचं मानसिक भरणपोषण करणारा, त्यांचे भावविश्व समृद्ध, सुंदर करणारा, मुलांच्या मनावर सुंदर संस्कारांची सहजपणे हसत- खेळत पेरणी करणारा हा एक सुंदर बालकवितांचा संग्रह आहे. या बालकवितासंग्रहात विविध विषयांवर कविता आहेत. सर्वच बालकविता सहज सुलभ अशा असून साध्या सोप्या शैलीत लिहिल्या आहेत. सर्व कविता गेय असून मुलांना ठेका धरायला लावणाऱ्या आहेत. प्रत्येक कवितेत छोटे छोटे; परंतु मुलांसाठी महत्त्वाचे संस्कार सहजपणे सांगितले आहेत. मुलांनी, पालकांनी आणि सर्व वाचकांनी वाचावा असा हा कवितासंग्रह आहे. सारेजण या बालकवितासंग्रहाचे निश्चितच स्वागत करतील याची खात्री वाटते. - सुभाष कवडे बालसाहित्यिक

View full details