Your cart is empty now.
'मनानं आणि शरीरानं विकसित व्हायचा काळ म्हणजे किशोरावस्था. आयुष्यातील एक अवघड वळण. काहीसं धोक्याचंही. स्वतःचीच एक नवीन ओळख व्हायला लागते – एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून. स्वप्नरंजनाला सुरुवात होते. पण हे सगळं का आणि काय घडतंय, याचा अर्थ मात्र उमगत नाही. त्यामुळे स्वप्नांभोवती धास्तीची, काळजीची काळी किनार उमटते. ओढ-आकर्षणाचा नेमका अर्थ कळत नाही. कधी नको इतका संकोच, कधी आक्रमकता. या ओढीच्याही विविध छटा अनुभवाला येतात, पण त्यांच्यातला नेमका फरक तर उमगत नाही. भावनेच्या आवेगात आयुष्याचं तारू भरकटण्याची शक्यता निर्माण होते. झपाट्यानं बदलत जाणा-या स्वत:च्या शरीराबद्दल अज्ञान असतं. भिन्नलिंगी देहाबद्दल कुतूहल वा जिज्ञासा असली तरी संकोचही असतो. साहजिकच निर्माण होतात गैरसमज, संभ्रम, शंकाकुशंका. ते तसं होऊ नये म्हणून, किशोरावसथा ओलांडत असलेल्या अक्षरशः हजारो मुलामुलींना गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी कलोचित मार्गदर्शन करण्याचं व्रत आचरलं, त्या साठे पतिपत्नींनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे वडीलधा-या हितचिंतकांच्या भूमिकेतून केलेलं मनमोकळं हितगूज. कोणताही आडपडदा न ठेवता मानवी देह-व्यवहाराचं त्यांनी केलेलं स्वच्छ शैलीतलं विवेचन असंख्य तरूण-तरूणींना सुखी जीवनाची अंकलिपी शिकवील, समाधानाचे आणि स्वास्थाचे धडे देईल. वाटेतल्या खाचखळग्यांबाबत सावधानतेचा इशारा देत असतानाच सुंदर सहजीवनाचं रहस्य उलगडून दाखवील. किशोरावस्था ओलांडत असताना प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक त्या सर्वांना हव्याशा वाटणा-या माहितीची शिदोरी ठरेल, यात शंकाच नाही. '
Added to cart successfully!