Hindutva Navhe Bharatiyatva by Laxmikant Deshmukh हिंदुत्व नव्हे भारतीयत्व
Hindutva Navhe Bharatiyatva by Laxmikant Deshmukh हिंदुत्व नव्हे भारतीयत्व
Couldn't load pickup availability
‘एके काळी भारतीय राजकारणाच्या परिघावर असणारा संघाचा हिंदुत्ववाद आज केंद्रस्थानी स्थानापन्न झाला आहे आणि त्यांनी भारतीय राष्ट्रवादास आणि ‘आयडिया ऑफ इंडिया`ला आव्हान दिले आहे. याची चर्चा मराठीतील नामवंत लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘हिंदुत्व नव्हे भारतीयत्व! : चिंतन आणि चिकित्सा` या पुस्तकात केली आहे. भारतीयत्वाच्या किंवा सहिष्णू व धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक पैलूंची अभ्यासपूर्ण मांडणी करणारं हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाचं हवं.` - डॉ. अशोक चौसाळकर ज्येष्ठ विचारवंत व लेखक ‘धार्मिक राष्ट्रवादाला नागरी राष्ट्रवादाचा पर्याय, या नव्या सिद्धान्ताची विचारप्रवर्तक मांडणी करीत लेखक या ग्रंथात हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ही संघ परिवाराची संकल्पना सांविधानिक सेक्युलॅरिझमच्या आधारे खोडून काढतात. त्यापुढे जाऊन ते भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी विवेकवादी मांडणी करतात. म्हणूनच हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो.` - मधू कांबळे ज्येष्ठ पत्रकार ‘आजच्या अस्वस्थतेच्या काळात समतावादी भारताचा समृद्ध वारसा लक्ष्मीकांत देशमुख आपल्या या ग्रंथातून कथन करतात. अर्थात या पुस्तकावर कशा प्रकारची चर्चा होते, यावरून मराठी ज्ञानविश्वाची दिशा स्पष्ट होईल.` - सर्फराज अहमद Hindutva Navhe Bharatiyatva ! | Laxmikant Deshmukh हिंदुत्व नव्हे भारतीयत्व! । लक्ष्मीकांत देशमुख