Hukumshahichya Savlit
Hukumshahichya Savlit
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
‘प्रतिभावान कथालेखिका वेंडेल स्टीव्हन्सन यांनी इराकबद्दल अतिशय वेगळे असे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी कौशल्याने आणि सुंदरपणे रंगविलेल्या जनरल कमेल सचेत यांच्या व्यक्तिरेखेत सद्दाम हुसेनच्या कारकिर्दीत इराकी जनतेला ज्या नैतिक संकटे, दडपशाहीची विकृत पद्धत आणि लहरीपणे केली जाणारी मेहेरनजर आणि भीतीचे वातावरण यांचा सामना करावा लागला, त्याचे सुंदर चित्रण आहे. हे एक उत्कट असे चरित्र आहे – एका व्यक्तीचे, त्याच्या कुटुंबाचे, त्याच्या देशाचे – पण आजही लागू होईल अशी ही कथा असून ती वाचल्यावर अनेक इराकी लोक शस्त्र का उचलतात, तडजोड का स्वीकारत नाहीत, भूतकाळातील हेवेदावे आणि दु:ख विसरायला ते तयार का नसतात आणि त्यांचा देश अशांत का आहे, याचे आकलन व्हायला मदत होते. ‘द वेट ऑफ ए मस्टर्ड सीड’ हे आतापर्यंत इराकवर आलेल्या पुस्तकांमधले सर्वांत जास्त अस्सल आणि विचारप्रवर्तक पुस्तक आहे. ते सद्दामच्या राजवटीतील एका जनरलच्या नैतिक प्रवासाचे वर्णन आहेच; पण ही मानवी सदसद्विवेकबुद्धीचा मागोवा घेण्यासाठी लेखिकेने युद्धकाळात केलेल्या प्रवासाची कथाही आहे. हे खरोखरीच एक असामान्य पुस्तक आहे. या कथेतून वेंडेल स्टीव्हन्सनकडे लिहिण्याची असाधारण क्षमता आहे, हे अगदी स्पष्ट दिसते. वेंडेल स्टीव्हन्सनचे हे सुंदरपणे लिहिलेले पुस्तक म्हणजे दुष्टपणा किती सार्वत्रिक आहे याचा डोळे उघडणारा, हृदय पिळवटून टाकणारा वृत्तान्त आहे.