1
/
of
1
I Am David (Marathi) by Anne Holm, Sanjay Bhaskar Joshi, Uma Patki आय ॲम डेव्हिड (मराठी)
I Am David (Marathi) by Anne Holm, Sanjay Bhaskar Joshi, Uma Patki आय ॲम डेव्हिड (मराठी)
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आय ॲम डेव्हिड - ॲन होम ,संजय भास्कर जोशी, उमा पत्की Author - Anne Holm, Sanjay Bhaskar Joshi, Uma Patki
सर्वाधिक अंधाऱ्या काळातच आशा सर्वाधिक उजळून दिसते. डेव्हिड एक बारा वर्षांचा मुलगा. त्याचं जन्मापासूनचं बारा वर्षांचं सगळं आयुष्य गेलं आहे एका कॉन्सेन्ट्रेशन कॅम्पमध्ये.
त्याला सुटकेची एकच संधी मिळते; तेव्हा बाहेरच्या जगाची, अगदी कशाकशाची, साधा करडा आणि मळकट हिरवा सोडून कोणत्या रंगांचीही त्याला ओळख नाही.
हसू म्हणजे काय, माणसानं कसं हसावं हेही त्याला माहीत नाही. पावलापावलावर शत्रूची चाहूल घेत तो या पूर्ण नव्या, अनोळखी जगाशी जुळवून घेत झगडत झगडत, आपल्या स्वातंत्र्याचा शोध घेतो.
साथीला आहे फक्त एक होकायंत्र, पावाचे काही तुकडे, त्याचे दुखरे पाय आणि 'डेन्मार्क देशात आसरा घे' इतकाच अस्पष्ट धूसर सल्ला. जिवंत राहायला पुरेल हे एवढं?
बारा वर्षाच्या एका शूर आणि साहसी मुलाच्या ॲन होम लिखित या प्रेरणादायक कहाणीनं एका महत्वाकांक्षी चित्रपटाला जन्म दिला आणि या अफाट लोकप्रिय कादंबरीनं जगातले अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवले.
एका थक्क करणाऱ्या उत्कंठावर्धक कादंबरीचं मराठी भाषांतर- आय ॲम डेव्हिड.
Share
