I Dare
I Dare
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीसयंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवार कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळ्यांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणायांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला. पण खरेच या व्यक्तींनी विकासाच्या मार्गात अडथळेअडचणी निर्माण करून, मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करून काय मिळवले? असे अनेक प्रश्न मागे उरतातच. किरण बेदी म्हणतात, ‘माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणायांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दृष्टी देणारे आणि जागरूक करणारे कथन!