Your cart is empty now.
हवा,पाणी,अन्न यांसारख्या नैसर्गिक गरजांबरोबरच माणसाला भावनिक गरज असते ती प्रेमाची. हेच प्रेम जेव्हा कोणत्याही परतफेडीच्या अपेक्षेशिवाय, शुद्ध मनाने केले जाते, तेव्हा ती 'भक्ती' बनते. संतचरित्रांतून अशा विशुद्ध भक्तीचे दर्शन आपल्याला घडते व आपल्या सांसारिक जीवनात ती अंगी कशी बाणवायची, याची शिकवण मिळते. आपला भारत देश संतांची भूमी म्हणूनही ओळखला जातो. याच देशात गोस्वामी तुलसीदास नावाचे अतिशय विख्यात असे रामभक्त आणि कविवृत्तीचे संत होऊन गेले. 'रामचरितमानस' या विख्यात ग्रंथाचे रचनाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. याखेरीज, तुलसीदासांनी लिहिलेले रामकृष्णादि दैवतांवर आधारित दोहे व अन्य रचनाही प्रसिद्ध आहेत. अशा या महान विभूतीचा आसक्तीने भरलेल्या सर्वसामान्य जीवनापासून ते गोस्वामी पदापर्यंत झालेला प्रवास विविध चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेला आहे. तुलसीदासांच्या या चरित्रातून विशुद्ध आणि संतुलित भक्तीचे रहस्य सरश्री आपल्यासमोर उलगडत आहेत.
Added to cart successfully!