Skip to product information
1 of 2

Jagane Sundar Ahe by Mohan Joshi ( जगणे सुंदर आहे )

Jagane Sundar Ahe by Mohan Joshi ( जगणे सुंदर आहे )

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 249.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
  • साधा विचार आणि निर्भेळ वर्तणूक यांच्यातून जगणं सुंदर करणाऱ्या भगवान या नायकाची गोष्ट सांगण्यासाठी वापरलेली भाषा सुलभ आणि वाचकस्नेही झालेली आहे.
  • कोरीव व्यक्तिचित्रणं, ओघवतं आणि रसाळ कथानक, सुंदर जगण्याची गुपितं चिमटीत पकडणारी कथासूत्रं याने नटलेली ही कलाकृती वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे.
  • दैनंदिन खडबडीत जगण्याला मूल्यांचा स्पर्श झाल्यास जगणं कोणकोणत्या अंगाने समृद्ध होऊ शकतं, याचा सारांश या कादंबरीतून समजतो.
  • एकूणच जीवन सुंदर आहेच; पण जगणं सुंदर आहे का? जगणं सुंदर कसं करता येईल, या प्रश्नांचा धांडोळा घेत जगणं सुंदर करणारी कलाकृती म्हणजे ही कादंबरी.


लेखकाविषयी :
कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेख, एकांकिका, नाटक, संदर्भ ग्रंथ, समीक्षा, बालसाहित्य अशा बहुविध साहित्यप्रकारात रुची आणि गती असणाऱ्या निवडक लेखकांमध्ये समावेश.
१९९९ मध्ये पाटबंधारे खात्यातून निवृत्त. सध्या पुणे येथे वास्तव्य.
‘कधी बहर कधी शिशिर’, ‘अथश्री’, (कादंबरी), ‘वेणा’, ‘पूर्णपुरुष’, ‘अनासक्त’ (कथासंग्रह), ‘शब्दस्पंदने’, ‘कविता शाळेच्या’ (कवितासंग्रह), ‘पश्चिमरंग आणि इतर एकांकिका’ (एकांकिका), ‘ज्ञानपीठाचे ज्ञानतपस्वी’ (संदर्भ ग्रंथ) या निवडक साहित्यासहित विविध पुस्तके प्रकाशित.
मराठी बाल-कुमार साहित्य सभा, कोल्हापूर या संस्थेत सहा वर्षे सहकार्यवाह या पदावर कार्यरत होते.
महाराष्ट्र शासनातर्फे दोन पुरस्कार आणि विविध संस्थांकडून अनेकविध मानाचे पुरस्कार प्राप्त.

View full details