सावल्या त्या निर्जन जागेतून सरकल्या. घोड्याच्या टापांचे आवाज खालच्या दगडी रस्त्यावरून जोरात आले. ते पुन्हा आले होते... ते गूढ पाहुणे, जे अंधाराच्या स्तराखाली जमेका इनमध्ये यायचे. मेरी येलाननं त्यांनी पुटपुटलेल्या त्या शपथा आणि त्यांचं भेसूर हास्य घाबरून ऐकलं. हे कोण लोक होते? तिच्या काकांचा आणि त्यांचा कोणत्या भयानक उद्योग होता? ही कथा आहे अनुराग, फसवणूक आणि मृत्यूची. एका भयानक कारस्थानाच्या जाळ्यात अडकलेल्या एका सुंदर तरुण स्त्रीची आणि न आवरता येणारं तिचं एका पाजी माणसावर जडलेलं प्रेम. डॅफने द्यू मोरियेर ह्याच्या अशा इतर जगप्रसिद्ध कादंब-यांप्रमाणेच ह्या त्याच्या कथेतही तीच अनिश्चितता आणि उत्कंठा आहे.