Japanese Magnolia (Marathi) By Rei Kimura Translated By Nirmala Mone
Japanese Magnolia (Marathi) By Rei Kimura Translated By Nirmala Mone
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
``तू आहेस का फुसावो? किती काळ मी तुझ्याशिवाय होतो? मला चैन पडत नव्हतं. ये. मला सुख दे. तू नेहमी देतोस तसं....`` फुसावो त्या विश्वास ठेवणाऱ्या चेहऱ्यापासून दूर झाला. एक बारीकशी किंकाळी फोडून आपल्या थरथरत्या हातातला सुरा त्यानं आपल्या प्रियकराच्या छातीत जोरानं खुपसला. तो सुरा मुठीपर्यंत आत जाईतो, तो थांबला नाही. बाहेर काढून आणखी एकदा, त्याच, त्याच्याविषयीच्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्याच्या इच्छेनं भरलेल्या हृदयात.... त्याला जाणवलं की, खोलीत कोणीच नव्हतं आणखी. आणि ओकिमोटोच्या ओठांवर शब्द होते, ``फुसावो, फुसावो, तू आलास?`` त्याच्या दगडी बनलेल्या चेहऱ्यावरून अश्रूंचा लोट वाहत होता. धक्का बसलेल्या त्या मुखातून त्याचंच नाव पुन:पुन्हा येत होतं, आणि एकच प्रश्न – का, का? रक्ताचा एक प्रवाह छातीतून, फुसावोला परिचित, अतिपरिचित असलेल्या त्या शरीरातून वाहू लागला. समलिंगी आकर्षणाच्या गर्हणीय प्रवाहात वाहवत गेलेल्या सामुराई आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा यांच्या प्रमाथी प्रेमकहाणीची हृदय हेलावणारी शोकांतिका.