Jinnah : India-Partition-Independence By Jaswant Singh Translated By Ashok Padhye
Jinnah : India-Partition-Independence By Jaswant Singh Translated By Ashok Padhye
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
/
per
१९०६ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला ९० टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५००० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ‘‘खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व ६००० हिंदूंची कत्तल घडवली. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव ८०० वर्षांनी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.