आजही अनेक खेडेगावांतील, आडगावातील मंदिरे जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत. तथापि, अशी जुनी मंदिरे, ऐतिहासिक वास्तू पाडून टाकून, चकाचक ‘मॉडर्न’ पद्धतीने बांधण्यापेक्षा, अस्तित्त्वातील वास्तूचे संवर्धन करून ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने आज, जीर्णोद्धार या नावाखाली योग्य सल्ला न घेता अनेक जुनी देवळे, वास्तू, वाडे पूर्णत: पाडून टाकून मॉडर्न स्टाईलमध्ये परावर्तित केलेली कामे सर्रास आढळतात. तथापि, यामुळे आपण त्या स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व हरवून टाकत आहोत, ऐतिहासिक वास्तुशैलीचा ठेवा नष्ट करून टाकत आहोत, एवढेच नव्हे तर आपलाच भूतकाळ आपल्याच हौसेपायी पुसून टाकत आहोत याची जाणीव हे बदल करणार्या कोणालाच नसते. त्याकरिता या कथनात एखाद्या वास्तूचा जीर्णोद्धार कोणत्या पद्धतीने करावा, वास्तुसंवर्धन कसे करावे यावर भरपूर भाष्य केले आहे.
जीर्णोद्धार म्हणजे तरी नक्की काय? तर रिपेअर्स, रिनोव्हेशन, रीकन्स्ट्रक्शन आणि कॉन्झर्वेशन या सर्व वेगवेगळ्या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन, मूळच्या वास्तुशैलीमध्ये ‘री-क्रिएशन’ किंवा ‘पुनर्निर्मिती’ करायचा प्रयत्न करणे, म्हणजेच मराठीतील ‘जीर्णोद्धार’. संवर्धनाच्या या पद्धतीला मर्यादा नाहीत, बाउंड्रीज नाहीत की लिमिट्स नाहीत.
नेमकी हीच संकल्पना मनात धरून ही कहाणी रचली आहे.
मनात जिद्द असली की कोणतेही काम अवघड राहत नाही असा विचार करून प्रयत्न करणार्या आणि स्वत:च्या अभ्यासावर, कामावर, विश्वास ठेवून काहीतरी नवीन करून दाखवायचे या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एका ‘कॉन्झर्वेशन’ म्हणजेच जीर्णोद्धाराशी संबंधित उच्च शिक्षण घेतलेल्या आर्किटेक्ट मुलीने, जीर्णोद्धार करण्यासाठी समोर आलेल्या वास्तूचे यथायोग्य संवर्धन करतानाच, कुतूहलाने त्या वास्तूच्या पूर्वेतिहासाचा शोध घेतला. त्या वेळी तिला आढळलेल्या, जाणवलेल्या आजूबाजूला दिसणार्या जुन्या खाणाखुणांवरून अंदाज बांधून तिने एक प्राचीन मंदिरही कसे शोधून काढले याचे वर्णन या कादंबरीत डॉ. अविनाश सोवनी यांनी केलेले आहे..
Jirnoddhar – जीर्णोद्धार
Jirnoddhar – जीर्णोद्धार
Regular price
Rs. 473.00
Regular price
Rs. 525.00
Sale price
Rs. 473.00
Unit price
/
per