Skip to product information
1 of 2

Kahat Kabir By Manjushri Gokhale ( कहत कबीर )

Kahat Kabir By Manjushri Gokhale ( कहत कबीर )

Regular price Rs. 333.00
Regular price Rs. 370.00 Sale price Rs. 333.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

मुस्लिम कुटुंबात वाढलेले कबीर रामनामात इतके दंग होते की, त्यांनी विणलेले वस्त्रही त्यांच्या भक्तिरंगात रंगून जात असे. कबीरदासांच्या आयुष्यातील घटनांचा आधार घेऊन लिहिलेली ही भावपूर्ण चरित्रात्मक कादंबरी कबीरांच्या संतत्वापर्यंतचा प्रवास चित्रित करते. त्याचबरोबर धर्माधर्मातील भेदभाव नष्ट करण्यासाठी कबीरांनी केलेल्या प्रयत्नांचा वेधही या चरित्रात्मक कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.


लेखिकेविषयी :
संतसाहित्याच्या अभ्यासक आणि संतचरित्रावर आधारित सकस कादंबरी लेखन करणाऱ्या लेखिका मंजुश्री गोखले यांची ५० पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, बालसाहित्य, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्या मुशाफिरी करीत असतात. विविध पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.

View full details