Tretayug by Anil Shinde त्रेतायुग
Tretayug by Anil Shinde त्रेतायुग
Couldn't load pickup availability
त्रेतायुगाचा काळ १२,९६,००० वर्षांचा मानला जातो. अनुकुल पर्यावरण, समशीतोष्ण हवामान, अतिशय सुपीक जमीन, पुरेसा पाऊस या सर्व कारणाने ‘आर्य’ म्हणविणाऱ्या लोकात स्थैर्य, समृद्धता, शांतता आली. ऋवेदाची निर्मिती, वेद व यज्ञसंस्था विकसित होऊन, वैदिक धर्म, संस्कृतीची उभारणी झाली, वेगवेगळ्या ऋषींनी केलेले तत्त्वचिंतन उपनिषदे म्हणून प्रसिद्ध झाले. या काळात नारायण व शिव या दोघांनी लोकांचे नेतृत्व केले. वैदिक संस्कृतीचा आधारस्तंभ ब्रह्मा आणि सरस्वती मानले गेले, कालांतराने राजसत्ता अधिक प्रबळ झाली. हैहयवंशीय कार्तवीर्य अर्जुन व भृगुवंशीय जमदग्नी, परशुराम यांच्यात संघर्ष झाल्याने परशुरामांनी हैहयवंशाच्या २१ कुळांचा संहार केला व कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून पश्चिम किनाऱ्यावर वसाहती वसविल्या. शिव, नारायण, परशुराम, राम, कृष्ण यांच्या युगप्रवर्तक कार्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यांचे आचार-विचार आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. मंदिरे, तीर्थस्थाने त्यामुळे निर्माण झाली. राजसत्तेच्या वर्चस्वामुळे वर्णसंस्था जाती- प्रजाती व्यवसायानुसार, स्थल-काळानुसार निर्माण झाल्या. त्रेतायुगात मानवाने केलेली भौतिक प्रगती खूपच थक्क करणारी आहे. श्री. अनिल शिंदे यांचे हे लेखन रंजक व वाचनीय आहे.
Share
