KARNALOK
KARNALOK
Regular price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 288.00
Unit price
/
per
आपलं कुळ, गोत्र, पूर्वजांच्या सात पिढ्यांची नावं घडाघडा बोलून दाखवू शकणारा; पण ज्याचं स्वतःचं नाव कादंबरीत कुठेच येत नाही असा नायक. विचित्र परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे , स्वतःचं नसलेलं घर सोडून जातो. ‘अनाथ` शब्दाची चीड असलेला हा बारा-चौदा वर्षांचा मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला` नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या` सुखदुःखांशी बांधला जातो. कुळ, वंश, जात या शब्दांचा अर्थ शोधतच मोठा होतो. केवळ शब्दातच अडकलेल्या अर्थाची निरर्थकता आणि साक्षात अनुभवातून सापडणारी जीवनाची सार्थकता यांचा वेध घेण्यात रमतो. त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं.... तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी...म्हणजेच ‘कर्णलोक.’