Katha Gurjari By Anjani Naravane
Katha Gurjari By Anjani Naravane
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
– स्वत:चं अफाट दु:ख मनात लपवून पोटापाण्यासाठी जिथे गरज असेल तिथं जाऊन, मन लावून काम करणारी वृद्धा.... – दिवस गेलेली, मूल हवं असलेली वेश्या; आणि मुलगी असेल तर दर वेळी गर्भपाताची सक्ती केली जाणारी ‘घरंदाज’ सून... – मन:स्तापानं डोकं फिरलेल्या आईच्या अत्यंत तापदायक वागण्याला कंटाळून तिला कुंभमेळ्यात ‘हरवून’ येणारा मुलगा... – येऊ घातलेल्या निवडणुकीत हटकून जिंकण्यासाठी गावात जातीय दंगलघडवून आणणारे नेते आणि त्यामुळं हकनाक बरबाद होणारी कुटुंबं... – कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानाचा मुलगा मनानं का होरपळतो?... – ऐन तारुण्यात पतीनं टाकून दिल्यावरची अनेक वर्षं अतिशय सुखी वैवाहिक जीवन जगत असल्याचं बेमालूम नाटक करणारी सुस्वरूप प्रौढा... अशा अनेक कथा. प्रत्येक कथा एका वेगळ्याच जगाचं, वेगळ्याच सुखदु:खांचं दर्शन घडवणारी, तर ‘बदल’, ‘झाड’, ‘नारायण! नारायण!’ ह्या कथा निखळ मनोरंजन करणाऱ्या! – वेगवेगळ्या गुजराती लेखकांच्या, मनाला भिडणाऱ्या कथांचा हा नजराणा गुणग्राही, चोखंदळ मराठी वाचकांना सादर!