नशीब आणि प्रारब्ध हे नेहमीच वादातील विषय मानले जातात. बरेच प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा नशिबाला आपण खुशाल दोष देऊन मोकळे होतो. पण खरंच नशीब घडवता येत का? नशिबाला दोष देणे योग्य आहे का? यशस्वी लोकांच्या नशिबातच यश लिहलेले असते का? ह्या प्रश्नाची उत्तरे मला माहीत नाहीत, पण नशीब घडविण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते दृष्टिकोन अंगिकारायला पाहिजेत, कशावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी धाडस करायला पाहिजे, कोणती कौशल्य शिकायला पाहिजेत हे मला कळलेले आहे. ते मी ह्या पुस्तकात माझ्या अनुभवावरून लिहलेले आहे. तुम्ही जर हे वाचलत, तर तुमचही नशीब त्यामुळे बदलून जाईन.