Skip to product information
1 of 1

Khadkavarli Hirval

Khadkavarli Hirval

Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
श्री. ना. पेंडसे यांनी कथा, कादंबरी, नाटक, आत्मरित्र या विविध वाड्मयप्रकारांत चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचं एकून लेखन आहे.
घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात.
‘खडकावरील हिरवळ’मधील सबंध निबंधांतून जिव्हाळा हा गुण प्रकर्षाने आकर्षित करतो. त्याला सूक्ष्म आणि मार्मिक निरीक्षणाची जोड मिळाल्यामुळे आणखीनच वाचनीय झाले आहेत. हे निरीक्षण कुठे करुन, कुठे विनोदी तर कुठे उपरोधिक स्वरूपात व्यक्त झाल्यामुळे साध्या विषयाला गहन अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणून यातील शब्दचित्रे अतिशय चित्ताकर्षक ठरतात.
श्री. ना. पेंडसे यांची मदार कल्पकतेपेक्षा अनुभूतीकर आणि चिंतनापेक्षा चित्रणावर अधिक आहे, हे ‘खडकावरील हिरवळ’ यामधून दिसून येते.
View full details