Skip to product information
1 of 1

Krantisanskruticha Arakhada By: Yashwant Manohar

Krantisanskruticha Arakhada By: Yashwant Manohar

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

'क्रांतिसंस्कृतीचा आराखडा' या पुस्तकात यशवंत मनोहर यांच्या तेवीस मुलाखती आहेत. या मुलाखतींमथून यशवंत मनोहर यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील त्यांच्या चाहत्यांनी आणि वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

साहित्य, संस्कृती, समाज, साहित्यसंमेलने, राजकारण, नीती, संविधान, जाती, धर्म, पुरस्कार आणि वाङ्मयीन महत्ता अशा सर्वच क्षेत्रांशी संबंधित प्रश्न त्यांना विचारले गेले.

या प्रश्नांच्या निमित्तानं संपूर्ण युगाचीच निर्णायक चर्चा या मुलाखतींमधून झालेली आहे. गतकाळ, विद्यमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही कालबंधात या मुलाखतींमधील मीमांसा फिरते.

या मुलाखतींमधील मनोहरांचं बोलणं कोणाचाही अनुनय करणारं वा कोणाचं रंजन करणारं नाही. या मुलाखतींमधील चर्चा गंभीर आहे आणि ती वर्तमानाच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवते. ही चर्चा वर्तमानातील अंधारातून निघणारी प्रकाशवाट अधोरेखित करते.

या मुलाखतींमधील चर्चा वाचकांना सजग,डोळस आणि अंतर्मुख करील, सर्वश्रेष्ठ इहवादी

नीतीची मर्मदृष्टी देईल आणि सद्विवेकाची महत्ता पटवून देईल ही खात्री मला आहे....

View full details