Kshatratej क्षात्रतेज By Vikramsinh Jayawantrao Mohite
Kshatratej क्षात्रतेज By Vikramsinh Jayawantrao Mohite
Kshatratej क्षात्रतेज By Vikramsinh Jayawantrao Mohite
क्षात्रतेज या पुस्तकाचे वैशिष्ट्य....
१) मराठा साम्राज्याच्या सरसेनापतींवर सचित्र कॉफी टेबल बुक प्रथमच प्रकाशित होत आहे.
२) या पुस्तकात प्रथमच प्राचीन भारतीय राजनीती, तत्त्वज्ञान आणि मराठा साम्राज्याची राजनीती यांचा संबंध जोडण्याचा हा प्रयत्न आहे.
३) क्षत्रिय मराठा राज्यकर्त्यांच्या शिक्षणावर प्रकाश टाकणाऱी समकालीन पुराव्यावर आधारित माहिती प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.
४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीतील घडामोडी एकाच आलेखात, एकाच पानात प्रथमच वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
५) सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या संस्कृत मधील मुद्रेचा मजकूर अर्थासहित प्रथमच प्रकाशित होत आहे.
६) सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची अप्रकाशित वंशावळ प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.
++ तसेच सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचे अश्वारूढ चित्र प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.
८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा मार्ग नकाशा द्वारा प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.
९) सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या वेल्लोर आणि जिंजी या किल्ल्यांचे जुने नकाशे या कॉफी टेबल बुक मध्ये दिले आहेत.
१०) भारताच्या नौदल आणि पायदळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे मराठा इतिहासावरील लेख प्रथमच एकत्रितपणे प्रकाशित करण्यात येत आहेत