आपल्यातील सुप्त नेतृत्वक्षमतांचे अवकाश विस्तारा!
तुम्ही कोणीही असला तरी, तुम्ही नक्कीच उत्तम नेतृत्व करू शकता.
नेतृत्व १०१ या आपल्या विलक्षण प्रभावी पुस्तकात न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे जॉन मॅक्सवेल वरील संदेश देतात. जॉन मॅक्सवेल यांच्यासारखा मुरब्बी नेता, या पुस्तकात आपल्यातील आपला जन्मजात नेतृत्वक्षमतांचा विकास कसा करावा यासाठी थोडक्यात; पण सुस्पष्ट व प्रेरणादायी आराखडा तयार करून देतात. ते आपल्याला पुढील गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देतातः
आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करा व इतरांना त्यात सामावून घ्या.
चिरस्थायी वारस निर्माण करा.
• आपल्या अनुयायांची निष्ठा विकसित करा.
• आपल्या नेतृत्वाच्या गुणवत्तेत सातत्याने गुंतवणूक करीत राहा.
• इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची क्षमता वाढवा.
• नेतृत्वाचा लगाम आपल्या हाती ठेवा.
• मार्गदर्शनाद्वारे इतरांचे सबलीकरण करा.
• विश्वासाचा पाया तयार करा.
• तुमचे चारित्र्य व परिणाम यात सुधारणा करण्यासाठी स्वयंशिस्त आत्मसात करा.
आपल्यातील सुप्त नेतृत्वक्षमतांचा अधिकाधिक विस्तार व वापर कसा करावा आणि लोकांमधून उत्तम नेते कसे घडवावेत याचे मार्गदर्शन करणारे प्रभावी पुस्तक.