Maasir-e-Alamgiri by Rohit sahatrabuddhe
Maasir-e-Alamgiri by Rohit sahatrabuddhe
Couldn't load pickup availability
पन्नास वर्षातील औरंगजेबाच्या प्रवासाचे १२ नकाशे व अनेक रंगीत चित्रांसहित, औरंगजेबाचा निकटवर्ती आणि त्या काळातील अनेक घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक़ी मुस्तैद खान याने लिहिलेल्या, औरंगजेबाच्या अधिकृत इतिहासाचा मराठी अनुवाद. सन १६५८ ते १७०७ इतकी दीर्घकाळ चाललेली औरंगजेबाची राजवट भारताच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. इस्लामचा झेंडा भारतीय उपखंडात सर्वत्र पसरवण्याचे त्याचे उद्दिष्ट होते व ते साध्य करण्याचा त्याने हर प्रकारे प्रयत्न केला. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे तर, 'या सगळ्या मागे माझा बाकी काही उद्देश नसून, धर्मयुद्ध हेच एकमेव उद्दिष्ट आहे'. सन १६८२ ते १७०७ ही पंचवीस वर्ष तर आलमगीर बादशाहाच्या नेतृत्वाखाली सर्व शक्तीनिशी लढणाऱ्या, भारतातील सर्वात बलाढ्य साम्राज्याला, अत्यंत कडवी, अविश्रांत आणि विजयी झुंज फक्त मराठ्यांनी दिली. आदिलशाही व कुतुबशाही ही दख्खन मधील प्रबळ सत्ताकेंद्रे मुघल वरवंट्याखाली चिरडली गेल्यानंतर ही, इथले किल्ले, शहरे व खेड्या पाड्यात, मराठ्यांचा स्वातंत्र्य यज्ञ अहोरात्र धगधगत होता. या सगळ्या घडामोडींचा समकालीन ऐतिहासिक वृतांत.
Share
