Skip to product information
1 of 1

Madhumati By Ranjeet Desai

Madhumati By Ranjeet Desai

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
मनस्वी कलावंतांच्या स्वप्नरम्य कथा `रणजित देसाई` यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातारणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या, सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसाईच्या कथांत वावरणाऱ्या स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसाईनच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतली स्वप्नमयता वाढावी, अशा तर्हेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाऱ्या व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाऱ्या अन् आपल्या दु:खात पिचणाऱ्या, त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...`
View full details