Skip to product information
1 of 1

Madhyayugin Dalit Santkavita : Samajik V Vangmayin Mulyamapan By: Dr. Sandip Sangale

Madhyayugin Dalit Santkavita : Samajik V Vangmayin Mulyamapan By: Dr. Sandip Sangale

Regular price Rs. 216.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 216.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

मध्ययुगीन दलित संतकविता सामाजिक व वाङ्मयीन मूल्यमापन हा डॉ. संदीप सांगळे लिखित वाङ्मयीन समीक्षा व वैचारिक चिंतनाचा संशोधनात्मक प्रकल्प आहे. मध्ययुगीन दलित कवींसह विविध संतप्रतिभांचा डॉ. संदीप सांगळे यांनी प्रस्तुत ग्रंथात घेतलेला परामर्श अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरावा.

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला केंद्रस्थानी मानून विविध दलित संत कवी व कवयित्रींनी आपल्या काव्यातून व्यक्त केलेली आर्तता मनाचा ठाव घेते. डॉ. सांगळे यांच्या प्रस्तुत ग्रंथात दलित साहित्याचे अंतरंग समर्थपणे व्यक्त झाले आहेत. संत जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा या कवयित्रींबरोबरच संत चोखामेळा, कर्ममेळा या मध्ययुगीन दलित कवींच्या काव्याचा प्रस्तुत ग्रंथामध्ये सामाजिक व वाङ्मयीन अंगाने केलेला अभ्यास मराठी संतवाङ्मयात मोलाची भर घालेल अशी खात्री वाटते.

मराठीचे अध्ययन, अध्यापन व संशोधन करणाऱ्या असंख्य अभ्यासकांसाठी प्रस्तुत ग्रंथ पर्वणी ठरेल यात शंकाच नाही.

View full details