Skip to product information
1 of 1

Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar By Navnath Shinde महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar By Navnath Shinde महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Regular price Rs. 130.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 130.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेबांनी सर्व क्षेत्रांवर काम करत असताना एक महत्त्वाचे कार्य पार पाडले ते म्हणजे भारतीय स्त्रियांमध्ये स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागृत करण्याचे. बाबासाहेबांच्या मते, भारतीय स्त्रियांच्या अवनतीला जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था व पुरुषसत्ताक पद्धती कारणीभूत असून स्त्री ही नेहमीच धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक बाबतीच्या सर्व प्रकारच्या अन्यायाला बळी पडताना दिसते. त्यांच्यावर लादलेली सतीप्रथा, वैधव्य, सक्तीचे ब्रह्मचर्य, बाल-जरठ विवाह यातून त्यांचे वारंवार झालेले अवमूल्यन मनुप्रणित व्यवस्थेने केलेली अवहेलना हे सर्व संपवण्यासाठी खरा जर कुणी प्रयत्न केला आहे तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी स्त्रियांच्या सुधारणेविषयी केलेले कार्य अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्यांनी मांडलेला जातीव्यवस्था निर्मितीचा सिद्धांत आणि त्यातील स्त्रियांची भूमिका समजावून घेणे आवश्यक आहे. जातीव्यवस्था आणि स्त्रिया यांचा सहसंबंध स्पष्ट करताना 'स्त्रिया या जातीव्यवस्थेचे प्रवेशद्वार आहे.' असे ते म्हणतात. भारतीय समाजव्यवस्था आणि धर्मव्यवस्था या दोन व्यवस्थांनी जातीची शुद्धता टिकवण्याची जबाबदारी स्त्रियांवरच टाकली. या संपूर्ण व्यवस्थेमुळे स्त्रियांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या प्रयत्नामध्ये 'हिंदू कोड बिल' खूप महत्त्वाचे आहे. यामुळे स्त्रियांना आंतरजातीय विवाहाचा, स्वतःच्या आवडीचा पती निवडण्याचा, मूल दत्तक घेण्याचा व दत्तक म्हणून जाण्याचा अधिकार स्त्रियांना प्राप्त झाला.

View full details