Maharani Durgavati by Indrayani Savkar महाराणी दुर्गावती इंद्रायणी सावकार
Maharani Durgavati by Indrayani Savkar महाराणी दुर्गावती इंद्रायणी सावकार
इतिहास गाजवणाऱ्या ज्या काही थोड्या स्त्रिया होऊन गेल्या, त्यातली दुर्गावती एक अग्रगण्य आहे. दुर्देवाने तिच्याबद्दल फारच थोडी माहिती लिहिण्यात आली आहे. ती शूर जितकी तितकीच देखणीही होती, हे तिचे आणखीही एक वैशिष्ट्य. शेरशहा, हेमू, राणी रूपमती व गोंड राजा संग्रामसिंह आणि त्याचा पुत्र दलपतराय सिंह या त्या काळातल्या म्हणजे सोळाव्या तकातल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा होत्या. या समजून घेण्यासाठीही प्रस्तुत कादांबरी वाचणे आवश्यक आहे. या काळात अकबर दिल्लीचा बादशहा होता. त्याने स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या सर्वांची नावे इतिहासातून वगळण्याचा हुकूम केल्यामुळे या व्यक्तिरेखांची नोंद इतिहासात नाही, दुर्गावतीच्या सौंदर्यामुळे तिला अनेकांनी मागण्या घातल्या त्यापैकी एक अकबर.
क्षत्रिय असूनही दलपतराय या गोंड म्हणजे आदिवासी राजपुत्रावर तिचे प्रेम बसले. ही प्रेमकहाणीही सुंदर आहे. दुर्दैवाने विवाहानंतर पाचच वर्षांनी दलपतराय स्वर्गवासी झाला परंतु दुर्गावतीने राज्य ताकतीने सांभाळले, ही कादंबरी विलक्षण घटनामय आहे. खेरीज नवनवीन माहिती देणारी आहे.