प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासीन्यामागं एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादानं कोणती शांती मिळणार? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं, तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं, ‘जो हसला, तो अमृत प्याला’ हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की, स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वत:च येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर ह्यालाच ‘सहजयोग’ म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथंजिथं विहार कराल, तेते तीर्थस्थळ. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासीन्यामागं एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादानं कोणती शांती मिळणार? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं, तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं, ‘जो हसला, तो अमृत प्याला’ हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की, स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वत:च येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर ह्यालाच ‘सहजयोग’ म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथंजिथं विहार कराल, तेते तीर्थस्थळ. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!