Majhi Atmakatha (माझी आत्मकथा) by Babasaheb Ambedakar
Majhi Atmakatha (माझी आत्मकथा) by Babasaheb Ambedakar
Majhi Atmakatha (माझी आत्मकथा) by Babasaheb Ambedakar
भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्ततेच्या मार्गाला आणावयाचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्यालत्त्याची फुकट सोय करून उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी तप्तर ठेवणे नव्हे, तर माणसामाणसामधील उच्च-नीच व श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्वज्ञानाने त्यांची वाढच खुंटवून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय! यासाठी खालच्या थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाजजीवनाने त्यांची कशी घोर फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाच शक्य होणार नाही. म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर शिक्षणप्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे.