‘काशीबाई’ या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते. एका अपराजित योद्ध्याच्या त्या धर्मपत्नी. त्या सालस, सदाचारी, समंजस होत्या. बाजीराव-मस्तानी यांची प्रेमकथा सर्वांनाच ज्ञात आहे. एका वीरपुरुषाचे तेजोमय, स्फूर्तीमय क्षात्रतेज झाकोळून जाऊ नये म्हणून पतीची आणि हो.. मस्तानीचीही पाठराखण त्यांनी केली.
त्यांचा जीवनपट आणि गुणवैशिष्ट्ये उलगडायचा प्रयत्न या कादंबरीतून केला आहे.