Mandir Vyavasthapan (Temple Management) by Suresh Haware मंदिर व्यवस्थापन सुरेश हावरे
Mandir Vyavasthapan (Temple Management) by Suresh Haware मंदिर व्यवस्थापन सुरेश हावरे
Couldn't load pickup availability
भारताला अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. भारतभरात विखुरलेली ३० लाखांहून अधिक मंदिरं या विविधतेची साक्ष देतात, ‘भाविकांची सेवा’ या पारंपरिक मानसिकतेला व्यवस्थापन कौशल्यातील आधुनिक विज्ञानवादी भूमिकेची जोड देऊन जर मंदिरांकडे बघता आलं, तर भारतामध्ये सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. प्रस्तुत पुस्तक हे, मंदीर व्यवस्थापन यासारख्या अभिनव विषयावरील प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याचा एक सक्रीय प्रयत्न आहे.
डॉ. सुरेश हावरे हे एक वरिष्ठ अणुशास्वज्ञ आणि यशस्वी उद्योजक तर आहेतच परंतु यासोबतच त्यांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित असे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाचे अध्यक्षपदही भूषवलेलं आहे.
या पुस्तकात मंदिराच्या निमित्ताने रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक बदल, आध्यात्मिक संस्कृती, स्मारकांचं संवर्धन, गर्दीचं व्यवस्थापन इ. पासून अत्याधुनिक ‘एआय’च्या वापरापर्यंत अनेक विषयांवर समग्र आणि सखोल विचार मांडलेले आहेत.
विविध विषयांतील तज्ज्ञ व्यावसायिक आणि शिक्षणसंस्था यांनी जर मंदिर व्यवस्थापनाचे विशिष्ट असे कोर्सेस आखून अमलात आणले तर मंदिरांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, सुयोग्य मनुष्यबळ निर्माण होईल. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वेलिंगकर व्यवस्थापन संशोधन संस्थेने हे कोर्सेस सुरुही केले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांतील सर्जनशील जनांना, या एका वेगळ्या, नाविन्यपूर्ण विषयात रस निर्माण होईल ही अपेक्षा आहे.
अभिनव मंदिर व्यवस्थापनासाठी एक मार्गदर्शक पुस्तक… मंदिर व्यवस्थापन !
Share
