सेवकाची प्रार्थना
हे विनम्रतेच्या सम्राटा !
दीन-दुबळ्यांच्या फाटक्या झोपडीतील निवासी!
गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रेच्या पाण्याने पवित्र झालेल्या देशात
तुला सर्वत्र शोधण्यासाठी आम्हाला मदत कर!
आम्हाला ग्रहणशीलपणा आणि मोकळे मन दे;
तुझा आपला निनम्रपणा दे;
हिंदुस्थानातील जनतेशी
एकरूप होण्याची शक्ती आणि उत्सुकता दे!
हे भगवंता !
तू तेव्हाच मदतीला धावून येतोस,
जेव्हा माणूस शून्य होऊन तुला शरण येतो!
आम्हाला वरदान दे,
की दास आणि मित्राच्या नात्याने
ज्या जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे,
त्यांच्यापासून आम्ही कधीही वेगळे होऊ नये.
आम्हाला त्याग, भक्ती आणि विनम्रतेची मूर्ती कर,
कारण, तेव्हाच या देशाला आम्ही अधिक समजू शवूâ
आणि अधिक प्रेम करू !