Your cart is empty now.
योग्य प्रकारे नियोजन करून जर मीटिंग घेण्यात आली, तर ती मीटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय ठरत नाही. कोणत्या गोष्टींमुळे मीटिंग यशस्वी किंवा अयशस्वी ठरते, याबाबत हे पुस्तक मार्गदर्शन करते. या पुस्तकातून ब्रायन ट्रेसी हे काही सोप्या पद्धती सांगताहेत, ज्यांचा उपयोग करून आपण यशस्वीपणे मीटिंग पूर्ण करू शकता. मग त्या मीटिंगचा उद्देश एखादी समस्या सोडवणं असो, एखादा निर्णय घेणं असो किंवा विचारांचे आदानप्रदान करणं असो किंवा कमीत कमी वेळेमध्ये अपेक्षित परिणाम साध्य करणं असो. मीटिंग म्हणजे जणू यशस्वी होण्यासाठीची पूर्वतयारी असते. या पुस्तकातील मार्गदर्शनामुळे तुम्ही आयोजित करत असलेली मीटिंग नक्कीच यशस्वी आणि सर्वांसाठी समाधानकारक ठरेल.
Added to cart successfully!