1
/
of
1
Mi, Sampat Pal, Gulabi Sadiwali Ranaragini By Anny Barthod Translated By Supriya Vakil
Mi, Sampat Pal, Gulabi Sadiwali Ranaragini By Anny Barthod Translated By Supriya Vakil
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सकाळचे आठ वाजलेत. मी आवरून तयार होतीय. यांत्रिकपणे माझ्या हालचाली घडतायत. मी माझ्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे माझं मुख्य कार्यालय आहे. मी केसांचा अंबाडा वळते, मग गुलाबी साडीची घडी उघडून ती नेसते. बाहेर जमलेल्या गर्दीचा गलका केव्हापासूनच कानावर पडतोय. त्या सगळ्या जणी युद्धासाठी सज्ज आहेत. माझ्याकडून एक इशारा मिळायचा अवकाश, त्या आणखी मोठ्यानं गर्जत उसळून उठतील! झालं... माझं आवरून झालंय. मी काठी घेऊन बाहेर जाते. मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेनं उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं : ‘‘गुलाबी गँग! गुलाबी गँग!’’ या साडीनंच आम्हाला लोकप्रिय बनवलं आहे.
Share
