Micro Finance - Part 1 by Sanjiv Chandorkar मायक्रो फायनान्स : गरीबांसाठी 'तारक' का 'मारक'
Micro Finance - Part 1 by Sanjiv Chandorkar मायक्रो फायनान्स : गरीबांसाठी 'तारक' का 'मारक'
Couldn't load pickup availability
गेली ३० वर्षे राबवल्या जात असलेल्या नवउदारमतवादी आर्थिक धोरणांमुळे, देशातील कोट्यवधी गरीब / निम्न मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर कर्जे काढणे भाग पडत आहे. शेती, अनौपचारिक क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातून मिळणारे उत्पन्न वाढत नाहीच आहे; आता त्यातील लक्षणीय हिस्सा कर्जाचे हप्ते / ईएमआय भरण्यात खर्ची पडत आहे. परिणामी राहणीमानाची किमान गुणवत्ता टिकवण्यासाठी हातात कमी पैसे उरत आहेत. राहणीमान टिकवण्यासाठी आणि हप्ते / ईएमआय भरण्यासाठी काही जणांना पुन्हा नवीन कर्जे काढाव लागत आहेत. अशी कुटुंबे पुढची अनेक वर्षे कर्ज सापळ्यात अडकण्याची भीती आहे. कर्ज वसुलीच्या वेळी होणारी हिंसा, मानहानी, कर्जाचे हप्ते फेडण्याच्या ताणाखाली सतत राहणे... हे सारे सहन न होऊन कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. हे सारे खूप गंभीर आहे.
Share
