Your cart is empty now.
उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय…. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीच… मग घरून पळून जाणं, कमाईसाठी लहान-सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच. त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो. चोऱ्या, पाकीटमारीचे धंदे, दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा, जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो… पण एके दिवशी त्याला’ मुक्तांगण’ नावाचं मोकळं पटांगण सापडतं… आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते. मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास !थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड !
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!