Your cart is empty now.
कंपनीमध्ये उत्साही, सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं वातावरण निर्माण करण्यात जे व्यवस्थापक यशस्वी होतात, तेच संस्थेची तूट भरून काढून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवून कंपनीला पुढं नेऊ शकतात. कर्मचार्यांना त्यांच्या कामाचा आनंद घ्यायला शिकवणं, कर्मचार्यांना आव्हानात्मक काम देऊन त्यांची मानसिक लवचीकता वाढवणं, स्वातंत्र्याशी आणि संलग्नतेशी निगडित असलेल्या कर्मचार्यांच्या गरजेची पूर्तता करणं, कर्मचार्यांच्या मनातून अपयशाची भीती घालवून त्यांना प्रयत्नवादी बनण्यासाठी प्रवृत्त करणं, कर्मचार्यांना मागे ओढणारे सगळे अडथळे काढून टाकणं, प्रगती करण्यासाठी आवश्यक तिथं प्रतिक्रिया देऊन मार्गदर्शन करणं... यासारख्या व्यक्तिगत किंवा समूहानं व्यवसायातील परिणामकारकता वाढवण्यासाठी असलेल्या जलद आणि प्रभावी असलेल्या एकवीस पद्धती या पुस्तकामध्ये सांगतिल्या आहेत.
Added to cart successfully!