Skip to product information
1 of 1

Nagpur Bhosale Ani Gadha Mandala नागपूरकर भोसले गढा-मंडला

Nagpur Bhosale Ani Gadha Mandala नागपूरकर भोसले गढा-मंडला

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Nagpur Bhosale Ani Gadha Mandala  नागपूरकर भोसले गढा-मंडला 

परस्पर सहकार्याने मराठा राज्याचे संवर्धन व संरक्षण करण्याऐवजी खासगी वतने व सरंजामासाठी मराठा सरदार परस्पर शस्त्र उपसण्यास सिध्द झाल्याची जी अनेक खेदजनक उदाहरणे मराठा इतिहासात आढळतात, त्यातील गढा-मंडलासाठी झालेला भोसले-पेशवे संघर्ष हा एक होय. गोंंड राजाकडून नागपूरचा अधिकार थोरले रघुजी भोसले यांनी मिळविल्यानंतर या राज्याच्या सीमा विस्तारण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी रघुजीने केली. नागपूर राज्याच्या सीमा विस्तारण्याच्या प्रक्रियेत असतानाच थोरले रघुजी भोसले यांचे लक्ष मध्य भारतातील गढा-मंडला या गोंड राज्याकडे गेले आणि गढा-मंडला मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्याचे मराठा संघाचा प्रमुख पेशवा बाजीराव पहिला याच्यांशी संघर्ष सुरु झाला.

गढा-मंडलाचा प्रश्न थोरले रघुजी भोसले व पेशवा पहिला बाजीरावाने आणि पुढे त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी प्रतिष्ठेचा बनविल्यामुळे भोसल-पेशवे संघर्ष मराठा राज्यासाठी घातक ठरला. भोसले-पशवे हे दोघे मराठा संघाचे प्रमुख आधारस्तंभ होते. या दोघांनी प्रामाणिकपणे मराठा संघाला आधार देऊन त्याला मजबूत करणे आवयक असूनही गढा-मंडला राज्याच्या प्राप्तीसाठी या दोन आधारस्तंभांनी आपल्या खर्‍या जबाबदारीकडे पाठ फिरवून त्यांनी एकमेकांविरुध्द दंड थोपाटले. गढा-मंडलाची प्राप्ती हा मुद्दा दोघांनीही प्रतिष्ठेचा बनविला. त्यातून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडून आल्या. ज्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मराठा राज्यावर झाले

View full details